प्रकरण ५

लाटेक्-वर्ग

ह्या प्रकरणात लाटेक्-वर्ग म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे, तसेच लाटेक्-वर्गांमुळे दस्तऐवजाच्या मूलभूत साच्यावर कसा परिणाम होतो हे दाखवले जाते. शिवाय टेक्-वितरणात आढळणाऱ्या विभिन्न लाटेक्-वर्गांची यादीदेखील ह्या प्रकरणात उपलब्ध आहे.

तुम्हाला हे जाणवले असेलच की आत्तापर्यंत आपण तयार केलेल्या सर्व लाटेक्-धारिकांची सुरुवात \documentclass ह्या ओळीने झाली. \documentclass{article} ही आत्तापर्यंत बहुतांश वेळा वापरली गेलेली आज्ञा आहे. (मागील प्रकरणात \chapter आज्ञेचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आपल्याला \documentclass{report} वापरण्याची गरजदेखील पडली.) ही ओळ जवळपास प्रत्येक लाटेक्-बीजधारिकेत असावीच लागते व बहुतांश वेळा ती पहिलीच आज्ञा असते.

लाटेक्-वर्ग निवडल्याने नेमके काय होते?

लाटेक्-वर्गाद्वारे दस्तऐवजाचा सर्वसाधारण साचा निवडला जातो, ज्यात -

ह्या प्रकारच्या बारकाव्यांचा समावेश असतो. वेगवेगळ्या लाटेक्-वर्गांच्या निवडीमुळे काही विशिष्ट आज्ञा वापरता येऊ शकतात ज्या अन्य लाटेक्-वर्गांसोबत चालत नाहीत. उदा. सादरीकरणाकरिता लागणाऱ्या आज्ञा लेख लिहिताना आवश्यक नसतात.

लाटेक्-वर्ग निवडण्याच्या ओळीत काही सार्वत्रिक प्राचलांची निवड करता येऊ शकते. सार्वत्रिक प्राचले हे असे काही घटक असतात ज्यांमुळे संपूर्ण आज्ञावलीवर काही प्रमाणात परिणाम होतो. ह्या प्राचलांची निवड पुढीलप्रकारे चौकटी कंसांत लिहून करता येते. \documentclass[<options>]{<name>}. ह्याप्रकारे वैकल्पिक माहिती चौकटी कंसांत भरण्याची रीत अनेक लाटेक् आज्ञांमध्ये पाहावयास मिळते.

पायाभूत लाटेक्-वर्ग

लाटेक् ही आज्ञावली काही पायाभूत लाटेक्-वर्गांसह वितरित केली जाते. त्यांची फलिते दृश्यरूपात बहुतांश प्रमाणात तशीच असतात, परंतु त्यांमध्ये काही बारीकसारीक बदल घडले असतात.

पहिल्या तीन लाटेक्-वर्गांमध्ये बहुतांश आज्ञा सारख्याच आहेत, परंतु letter लाटेक्-वर्गात उपलब्ध असणाऱ्या आज्ञा मात्र वेगळ्या आहेत.

\documentclass{letter}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}

\begin{letter}{Some Address\\Some Street\\Some City}

\opening{Dear Sir or Madam,}

The text goes Here

\closing{Yours,}

\end{letter}

\end{document}

ओळतोडीसाठी वापरल्या गेलेल्या \\ ह्या आज्ञेकडे लक्ष द्या. आपण ओळतोडीच्या आज्ञांकडे लवकरच स्वतंत्रपणे पाहणार आहोत. तसेच हेदेखील पाहा की letter लाटेक्-वर्ग वापरल्यामुळे letter नावाचे नवे क्षेत्र वापराकरिता उपलब्ध झाले. त्या क्षेत्रांतर्गत काही विशिष्ट आज्ञादेखील उपलब्ध झाल्या.

article, reportbook हे लाटेक्-वर्ग 10pt, 11pt12pt ही प्राचले स्वीकारतात. ह्यांद्वारे टंकाचा आकार सार्वत्रिकरीत्या ठरवला जातो. twocolumn ह्या प्राचलाद्वारे द्विस्तंभीय दस्तऐवज बनवला जातो.

Function-rich classes

हे सर्व लाटेक्-वर्ग प्रचंड स्थिर आहेत, परंतु ह्याचाच अर्थ असाही होतो की त्यांच्यात फार मोठे बदल शक्य नाहीत. त्यांच्यात आता नव्या आज्ञांची भर पडणेदेखील कठीण आहे. कालानुरूप नवे लाटेक्-वर्गदेखील घडवण्यात आले आहेत ज्यांच्यात नव्या व आवश्यक आज्ञांची भर घालण्यात आली आहे. आपण त्यांच्याकडे लवकरच पाहूया.

अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी ह्या संस्थेकडून amsartamsbook नावाचे दोन लाटेक्-वर्ग पुरवले जातात. हे गणिती नियतकालिकांमध्ये आढळणाऱ्या साच्याची नक्कल करणारे लाटेक्-वर्ग आहेत.

आणखी दोन लोकप्रिय व प्रगत लाटेक्-वर्ग म्हणजे KOMA-Script bundlememoir. KOMA-Script ह्या आज्ञावलीतर्फे काही समांतर लाटेक्-वर्ग पुरवले जातात. क्रमशः scrartcl, scrreprt and scrbook. memoir हा मात्र book ह्या लाटेक्-वर्गाचा प्रगत आविष्कार आहे.

ह्या प्रगत लाटेक्-वर्गांसह वैयक्तिकीकरणाचे नवे उपाय उपलब्ध झाले आहेत. आपण स्वाध्यायांमध्ये ते शिकणार आहोत. त्याविषयीची सविस्तर चर्चा प्रकरण १५मध्ये करण्यात आली आहे.

सादरीकरणे

slides हा लाटेक्-वर्ग भौतिक चौकटी बनवण्यासाठी ८०च्या दशकात तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्यात पीडीएफ्-स्वरूपातील सुसंवादी सादरीकरणे बनवण्याची व्यवस्था नाही. त्यांसाठी काही विशेष लाटेक्-वर्ग घडवण्यात आले आहेत. ते सर्वसाधारण लाटेक्-प्रमाणे कार्य करत नाहीत, त्यांच्यात विशेष आज्ञांचा वापर केला जातो. त्यामुळे आम्ही त्यांचा समावेश अधिक माहितीच्या प्रकरणात केला आहे.

स्वाध्याय

लाटेक्-चे प्रमाण वर्ग, memoir तसेच KOMA bundleमधील लाटेक्-वर्गांची आपापसात अदलाबदल करून फलिताच्या दृश्यरूपात काय फरक पडतो ते पाहा.

\documentclass{article} % लाटेक्-वर्ग इथे बदला.
\usepackage[T1]{fontenc}

\begin{document}

\section{Introduction}

This is a sample document with some dummy
text\footnote{and a footnote}. This paragraph is quite
long as we might want to see the effect of making the
document have two columns.

\end{document}

twocolumn हे प्राचल वापरा व दृश्यरूपात होणारा बदल पाहा.

scrreprt हा लाटेक्-वर्ग निवडा. वरील उदाहरणात \sectionऐवजी \chapter वापरा व पुढील सार्वत्रिक लाटेक्-वर्ग-प्राचले वापरल्यामुळे काय फरक पडतो ते पाहा.