प्रकरण २

ह्या अभ्यासक्रमातील बहुतांश उदाहरणांकरिता आपण लाटेक् ही आज्ञावली न वापरता पीडीएफ्-लाटेक् ही आज्ञावली वापरणार आहोत. लाटेक् आज्ञावल्यांचे एक कुटुंब आहे. त्यातील सर्व आज्ञा लाटेक् ह्या मूळ आज्ञावलीवर आधारित आहेत. ह्या संकेतस्थळावर आम्ही पीडीएफ्-लाटेक् हा चालक निवडला आहे, कारण सामान्यतः इंग्रजी मजकुराची अक्षरजुळणी करताना हा सर्वाधिक वापरला जाणारा चालक आहे.

स्वरूपे व चालक

ह्यापूर्वी पाहिल्याप्रमाणे, लाटेक् ही आज्ञावली टेक् ह्या मूळ आज्ञावलीवर आधारलेली आहे. लाटेक् ही आज्ञावली टेक्-ला कळू शकेल अशा काही सुलभीकृत आज्ञांचा संच आहे. जेव्हा पीडीएफ्-लाटेक् ही आज्ञावली चालवली जाते, तेव्हा वास्तविक पीडीएफ्-टेक् ही आज्ञावली लाटेक्-विशिष्ट आज्ञांसकट चालवली जात असते. पीडीएफ्-टेक् हा एक चालक आहे, ज्यास टेक्-च्या आज्ञांचे अर्थ कळतात.

आज तीन लाटेक्-चालक प्रचलित आहेत.

ह्या दोन चालकांचे मुख्य वैशिष्ट्य असे की संगणकावर बसवलेले टंक वापरण्याची क्षमता ह्यांमध्ये आहे. पीडीएफ्-टेक् हा चालक मात्र हे करू शकत नाही. लुआटेक् व झीटेक् ह्यांविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत.

तुम्हाला जपानी लिहिण्याची गरज पडत असेल, तुम्ही पीटेक् व अपटेक् ह्या दोन चालकांचा वापरही करू शकता. हे चालक उभ्या मांडणीसाठी विशेषतः तयार केले गेले आहेत. लुआटेक् ह्या चालकासदेखील बहुतांश गोष्टी हाताळता येतात, परंतु सध्या जपानीकरिता अपटेक् हाच सर्वात प्रसिद्ध चालक आहे.